Posts

स्वप्ने आणि वास्तविकता

Image
आपण स्वप्नांकडे कसे पाहतो ह्यावर ती कारण किंवा अकारण आहेत हे आपल्याला समजते. वास्तविकपणे पाहता स्वप्न ही काही क्षणांची असतात. त्यामूळे त्यांचें महत्त्व ही आपल्याला एवढे वाटत नाही. मग स्वप्ने खरंच इतकी विचारात न घेण्यासारखी आहेत? हे जग, ही वास्तविकता जी आपण आता अनुभवतो आहे ती एका काळात घटत असणारी गोष्ट आहे. एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही. त्यामूळे प्रत्येक क्षण अद्वितीय असतो. वेळ हा एक धागा आहे आणि वस्त्र म्हणजे क्षण. तो क्षण घडवून आणण्यासाठी काळ कितीतरी गोष्टी विणत असेल.  स्वप्ने ही देखील क्षण आहेत. ती आपण पाहतो, ती त्यावेळी अनुभवतो, त्यात आपण काहीं काळ राहतो, म्हणजे ती देखील ह्या विशाल काळाचा भाग आहेत. आता हा आपला वैयक्तिक भाग झाला की आपण किती क्षणांना महत्त्व देतो आणि किती क्षणांना नाही महत्त्व देत. पण त्यामूळे त्या क्षणांचे उद्देश असफल होत नाही. कारण ते क्षण काहीं कारणांसाठी घडत असतात.  आपण पक्षी नाही पण स्वप्नांत आपण स्वतःला हवेत उंच तरंगताना पाहता. आपण एखाद्या व्यक्तीला स्वप्नांत सहज भेटतो जिची भेट आपल्याला जागृत जगात कठिण वाटते.  स्वप्ने आपल्याला अश्या ...

स्वप्नावस्थेतील गोष्ट

Image
बहुतेक गोष्टींना प्रारंभ आणि शेवट असतो. पण स्वप्नावस्थेतील गोष्टी वेगळ्या असतात. ह्या अवस्थेतील गोष्टींची ना सुरुवात माहित असते ना त्यांचा शेवट माहीत असतो. ह्या गोष्टी अधांतरी राहतात. जर गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठाऊक नसेल तर गोष्ट समजणार तरी कशी? निव्वळ अंदाज बांधून जर ती गोष्ट रचली तरी गेली तरी त्या गोष्टीचा उद्देश त्याच्या प्रारंभाशी निगडित असेलच. आता हेच पाहा, ह्या विश्वाचा प्रारंभ कित्येक वैज्ञानिक व इतर बुद्धिजीवी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ह्या विश्वाच्या प्रारंभाचे वेगवेगळे अंदाज बांधून त्यावर सखोल विश्लेषण ही केले जात आहे.  प्रत्येक क्रियेला कारण आहे. तसे स्वप्नांतील गोष्टींना काहीना काही कारण असेलच. दिवसभरात आपण निरनिराळे विचार करीत असतो. त्याचा आपल्या मनात संचय होतो. आपण जरी त्यांचे फार वेळ मंथन करीत बसलो नाही तरी ते विचार मनाच्या कोणत्यातरी कानोस्यात राहतातच आणि रात्री झोपल्यावर आपण मनातील साचलेल्या विचारांच्या अमर्यादित विश्वात प्रवेश करत असतो. तांदळातून खड्यांची जशी निवड करावी तशी स्वप्नेदेखील एखाद्या ठराविक विचाराची निवड करून आपल्याला त्यावर आधारित...