Posts

Showing posts with the label स्वप्ने

भावविश्व

Image
L एखादा विचार मनात यावा आणि दुसऱ्याक्षणी तो निघून जावा, तसच आपण एका क्षणी स्वप्नात प्रवेश करतो आणि दुसऱ्याक्षणी त्यातून बाहेर येतो. स्वप्नात घडणाऱ्या घटनांना सुरूवात नसते. जेव्हा आपण स्वप्नात प्रवेश करतो तेव्हा एखादा प्रसंग चालु असतो आणि आपण काही क्षण तिथे घालवतो. जणू काही आपली उपस्थिती तिथे क्रमप्राप्त असते. पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण होते न होते तोवर आपण स्वप्नातून बाहेर येतो.  एकंदरित स्वप्नातील हा घटनांचा खेळ निरंतर चालु असतो. जेव्हा आपल्या उपस्थितीची त्यात आवश्यकता असते, तेव्हा आपण स्वप्नात आपसूकच हजर होतो. पण स्वप्नातील आपली उपस्थिती ही आपल्या ताब्यात नसते आणि त्यातील घडणाऱ्या गोष्टींवरही आपला ताबा नसतो. तिथे आपण केवळ आणि केवळ एक प्रेक्षक असतो. स्वप्ने आणि स्वप्नातील गोष्टींची एक वेगळी इच्छाशक्ती असते. ती शक्ती तिच्या मायेने आपल्याला घडणाऱ्या गोष्टींची साक्षी बनवत असते.  जागृत जगात आपला बराचसा ताबा असतो. बऱ्याच गोष्टी आपण ठरवून करतो तर काही गोष्टी नकळत घडतात. पण त्या गोष्टींचा प्रतिसाद आपल्याला हवा तसा मिळेलच याची शाश्वती देता येत नाही आणि काही गोष्...

स्वप्ने आणि वास्तविकता

Image
आपण स्वप्नांकडे कसे पाहतो ह्यावर ती कारण किंवा अकारण आहेत हे आपल्याला समजते. वास्तविकपणे पाहता स्वप्न ही काही क्षणांची असतात. त्यामूळे त्यांचें महत्त्व ही आपल्याला एवढे वाटत नाही. मग स्वप्ने खरंच इतकी विचारात न घेण्यासारखी आहेत? हे जग, ही वास्तविकता जी आपण आता अनुभवतो आहे ती एका काळात घटत असणारी गोष्ट आहे. एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही. त्यामूळे प्रत्येक क्षण अद्वितीय असतो. वेळ हा एक धागा आहे आणि वस्त्र म्हणजे क्षण. तो क्षण घडवून आणण्यासाठी काळ कितीतरी गोष्टी विणत असेल.  स्वप्ने ही देखील क्षण आहेत. ती आपण पाहतो, ती त्यावेळी अनुभवतो, त्यात आपण काहीं काळ राहतो, म्हणजे ती देखील ह्या विशाल काळाचा भाग आहेत. आता हा आपला वैयक्तिक भाग झाला की आपण किती क्षणांना महत्त्व देतो आणि किती क्षणांना नाही महत्त्व देत. पण त्यामूळे त्या क्षणांचे उद्देश असफल होत नाही. कारण ते क्षण काहीं कारणांसाठी घडत असतात.  आपण पक्षी नाही पण स्वप्नांत आपण स्वतःला हवेत उंच तरंगताना पाहता. आपण एखाद्या व्यक्तीला स्वप्नांत सहज भेटतो जिची भेट आपल्याला जागृत जगात कठिण वाटते.  स्वप्ने आपल्याला अश्या ...