स्वप्नावस्थेतील गोष्ट
बहुतेक गोष्टींना प्रारंभ आणि शेवट असतो. पण स्वप्नावस्थेतील गोष्टी वेगळ्या असतात. ह्या अवस्थेतील गोष्टींची ना सुरुवात माहित असते ना त्यांचा शेवट माहीत असतो. ह्या गोष्टी अधांतरी राहतात. जर गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठाऊक नसेल तर गोष्ट समजणार तरी कशी? निव्वळ अंदाज बांधून जर ती गोष्ट रचली तरी गेली तरी त्या गोष्टीचा उद्देश त्याच्या प्रारंभाशी निगडित असेलच. आता हेच पाहा, ह्या विश्वाचा प्रारंभ कित्येक वैज्ञानिक व इतर बुद्धिजीवी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ह्या विश्वाच्या प्रारंभाचे वेगवेगळे अंदाज बांधून त्यावर सखोल विश्लेषण ही केले जात आहे. प्रत्येक क्रियेला कारण आहे. तसे स्वप्नांतील गोष्टींना काहीना काही कारण असेलच. दिवसभरात आपण निरनिराळे विचार करीत असतो. त्याचा आपल्या मनात संचय होतो. आपण जरी त्यांचे फार वेळ मंथन करीत बसलो नाही तरी ते विचार मनाच्या कोणत्यातरी कानोस्यात राहतातच आणि रात्री झोपल्यावर आपण मनातील साचलेल्या विचारांच्या अमर्यादित विश्वात प्रवेश करत असतो. तांदळातून खड्यांची जशी निवड करावी तशी स्वप्नेदेखील एखाद्या ठराविक विचाराची निवड करून आपल्याला त्यावर आधारित...