Posts

Showing posts with the label स्वप्ने आणि परमात्मा

स्वप्ने आणि परमात्मा

Image
महापुरुषांनी ह्या जगास स्वप्नवत दर्शविले आहे. परंतु ते खरेच स्वप्नवत आहे का? स्वप्नात आपण एक साक्ष म्हणून वावरतो. स्वप्नातील घटनांचा व त्यातील आपल्या अस्तित्वाचा विचार केला असता त्या केवळ स्वप्नापुरता मर्यादित असतात. बरे स्वप्न ह्या त्या स्थितीपुरता मर्यादित मानले तर त्या स्थितीत मर्यादित काळापुरता घडणाऱ्या घटना तितक्याच वास्तविक असतात.  स्वप्नाचा उद्गम ही आपल्यातूनच होतो, त्याचे संचालनही आपले मन करते आणि त्याचा लय आपण जागृत झाल्यावर होतो. ती स्वप्नस्थिती आपल्यात निर्माण होते म्हणून स्वप्नातील सृष्टी, त्यातील माणसे व इतर प्राणी, त्यातील निर्जीव वस्तू ह्या सर्व आपणच असतो. तसेच ह्या जागृत जगताचे आहे. जो ह्या जागृत जगताचा सृष्टीकर्ता आहे, तोच चराचरात व्यापून राहिला आहे. तोच अखंड परमात्मा सत्य असेल तर हे जग ही तेवढेच सत्य आहे. म्हणून आपण खरे आहोत व स्वप्नातील त्या स्थिती ह्या खऱ्या आहेत.  आता ह्या सृष्टीत ठायीठायी परमात्मा असेल तर आपणही त्याचेच स्वरूप आहोत असे समजणे म्हणजे आपण त्या परमात्म्याशी एकरुप होणे होय. इथे प्रत्येक वस्तू आपलेच स्वरूप आहे हेही ह्याद्वारे आपल्या ...